दोन वर्षाकरीता हद्दपार असलेला महेंद्र उर्फ लहाण्या अशोक महाजन (वय ३२, रा. तळेले कॉलनी) तर बाजारपेठेत चॉपर घेवून दहशत माजविणाऱ्या संदीप विजय नाथ (वय २८, रा. नाथ गल्ली, तांबापुरा) या दोघांवर घाणेकर चौकात कारवाई करीत जेरबंद केले. ही कारवाई बुधवारी २७ ऑगस्ट रोजी दुपारी ३ वाजता शनिपेठ पोलिसांनी केली असून त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.