सेनगांव तालुक्यातील दाताडा बुद्रुक परिसरातील कानिफनाथ देवस्थान या ठिकाणी आज कर निमित्त यात्रा महोत्सव आयोजित करण्यात आला. पोळ्याच्या दुसऱ्या दिवशी कर निमित्त दरवर्षीप्रमाणे याही वर्षी यात्रा महोत्सव आयोजित करण्यात आला असुन या यात्रा महोत्सवामध्ये दाताडा बुद्रुक,आजेगांव,वटकळी, वाघजाळी,म्हाळशी, शिंदेफळ सह गावातील नागरिक मोठ्या संख्येने कानिफनाथाचे दर्शन घेण्यासाठी यात्रा महोत्सवात सहभागी झाले. गावकऱ्यांच्या वतीने येणाऱ्या भाविकांसाठी भव्य अशा महाप्रसादाचे आयोजन देखील करण्यात आले.