भक्ती, शक्ती आणि संस्कृतीने पावन झालेल्या व ऐतिहासिक पार्श्वभूमी लाभलेला पिंपळनेर येथील श्री सद्गुरू समर्थ खंडोजी महाराजांचा १९७ वा श्री नामसप्ताह सुरू असून आज रविवारी ३१ ऑगस्ट रोजी पहाटे ५ ते ७.३० या कालावधीत विठ्ठल मंदिर संस्थानात गुलाल उधळण महाकाकड आरती संपन्न झाली.भाविकांनी मोठ्या आनंदाने या कार्यक्रमात सहभागी होत भक्ति गीतांवर ठेका धरला.मंदिरात सर्वत्र गुलालाची उधळण झाल्यानंतर भाविकांनी प्रसाद वाटप करण्यात आला.तर पालखी सोहळा आज रात्री ११.३० ते १ सप्टेंबर सकाळी ८ वाजेपर्यंत होणा