गणेश चतुर्थी निमित्त आज नागपूरकरांचे आराध्य दैवत असलेले गणेश टेकडी मंदिरात सकाळपासूनच भक्तांची गर्दी पाहायला मिळाली. यानिमित्त मंदिरात आकर्षक अशी सजावट देखील करण्यात आलेली आहे. पहाटेच्या पहिल्या आरती पासूनच इथे मोठ्या प्रमाणात भक्तांची गर्दी आहे. दरम्यान कोणत्याही प्रकारची अप्रिय घटना होऊ नये म्हणून पोलिसांचा बंदोबस्त देखील आहे. नागपूरकर अत्यंत उत्साहात गणपती बाप्पाचे दर्शन घेत आहे.