इचलकरंजी येथील निरामय रोडवरील ब्रह्माकुमारी केंद्रात आज,रविवार २४ ऑगस्ट रोजी राजयोगिनी दादी यांच्या १८ व्या पुण्यतिथीनिमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले.सकाळी ११ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत चाललेल्या या उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.या शिबिरास आमदार राहुल आवाडे यांनी आज रविवार दिनांक 24 ऑगस्ट रोजी दीड वाजता भेट देऊन रक्तदात्यांचे व सेवाभावी कार्यकर्त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन केले.