24 ऑगस्ट रोजी रविवारला सकाळी 6 वाजेच्या दरम्यान पाथरी येथे ढोल ताशाच्या गजरात मार्बत ची मिरवणूक काढण्यात आली. पारंपारिक प्रथेनुसार यंदाही पोळ्यानंतर पाडव्याच्या दिवशी सकाळी मार्बत मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले होते. परंपरा अबाधित ठेवून गावातील हौसीयुवक व नागरिकांनी पाथरी येथील मुख्य चौकातून मिरवणूक काढली. यावेळी "जागे मार्बत व ढेकूण मोंगसा घेऊन जागे मार्बत" या जयघोषाने उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते. यावेळी गावकऱ्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष केवलभाऊ बघेले उपस्थित होते