उल्हासनगरच्या गीता कॉलनी परिसरामध्ये पहाटेच्या सुमारास नशेखोर तरुणांनी चांगलाच धुमाकूळ घातला. परिसरातील दहा गाड्यांची तोडफोड केली आणि ट्रक चालकाला मारहाण करून त्याला गंभीर जखमी केले आहे. अचानक परिसरामध्ये घटना घडल्यामुळे परिसरात दहशतेचे वातावरण निर्माण झाले. माहिती मिळताच विठ्ठलवाडी पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून तोडफोड झालेल्या गाड्यांची पाहणी केली आणि प्रकरणाचा पुढील तपास सुरू केला आहे.