गेल्या दोन दिवसात एकूण ४५ लाख ८७ हजार ३५९ रुपये दंड वसुली झाली आहे. तितक्याच दंडात सुट दिली गेली आहे. लोकअदालतीची मुदत वाढवावी तसेच अधिकची व्यवस्था करावी अशी वाहनचालकांनी मागणी केली आहे. दरम्यान, डिसेंबर महिन्यात पुन्हा लोकअदालतीचे आयोजन केलं जाणार असल्याचे पोलीस उपायुक्त हिम्मत जाधव यांनी सांगितले आहे.