बीड जिल्ह्यातील वडवनी येथे आज बंजारा समाजाच्या वतीने एक भव्य मोर्चाचे आयोजन करण्यात आले. बंजारा समाजाला एसटी प्रवर्गात समाविष्ट करावे तसेच महाराष्ट्रामध्ये हैदराबाद गॅजेट लागू करावे, या प्रमुख मागण्यांसाठी हा मोर्चा काढण्यात आला होता. तहसील कार्यालयावर झालेल्या या मोर्चामध्ये बंजारा समाज बांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. महिलांपासून ते तरुणांपर्यंत सर्व समाजबांधवांचा उत्स्फूर्त सहभाग दिसून आला. ठिकठिकाणी "बंजारा समाजाला न्याय मिळालाच पाहिजे", "एसटी प्रवर्गात समावेश करा" अशा घोषना