हवामान खात्याने दिलेले इशारानुसार सातारा जिल्ह्यात प्रचंड प्रमाणात पाऊस सुरू झाला असून धरणांच्या पाणलोट क्षेत्रामध्ये मुसळधार पर्जन्यवृष्टी सुरू आहे, त्यामुळे धरणांच्या पाणीसाठ्यात लक्षणीय वाढ झाली आहे. कोयना, धोम, धोम बलकवडी, कण्हेर, उरमोडी धरणांसह येरळवाडी तलावातून पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. सातारा जिल्हा प्रशासनाकडून याबाबत शनिवारी दुपारी दीड वाजता अधिकृत माहिती देण्यात आली. कोयना धरणाचे सर्व सहा दरवाजे सकाळी दहा वाजता एक फूट उघडण्यात आले होते.