देशाला स्वातंत्र्य मिळून75वर्षे झाली परंतु साकोली शहरात प्रथमच नागरिकांसाठी नागझिरा रोड व एकोडी रोड येथे दोन सुलभ शौचालय मुख्याधिकारी मंगेश वासेकर यांच्या प्रयत्नांने बांधण्यात आली आहे.या दोन्ही सुलभ शौचालयाचे उद्घाटन गुरुवार दि.28आँगष्टला दुपारी3वाजता मुख्याधिकारी मंगेश वासेकर यांच्याहस्ते करण्यात आले.जनतेच्या सेवेत ती आजपासून खूले करण्यात आली.उद्घाटनप्रसंगी अभियंता संतोष दंतुलवार,अभियंता शुभम दुरुगकर तसेच स्वच्छता निरिक्षक मुकेश शेंदरे व शहर समन्वयक मिलन गजापुरे यांची उपस्थिती होती