भंडारा ते तुमसर राष्ट्रीय महामार्गावर अनेक जीवघेणे खड्डे पडले असून या खड्ड्यांमुळे अपघाताची मालिका सुरू झाली आहे. दरम्यान रस्त्यावरील खड्डे बुजविण्यासाठी शासनाकडून कोणतीही कारवाई होत नसल्याने भंडारा गोंदिया लोकसभा क्षेत्राचे खासदार प्रशांत पडोळे यांनी आज दि. 6 सप्टेंबर रोज शनिवारला दुपारी 1 वा. हातात साहित्य घेऊन खड्डे बुजवण्याची जबाबदारी उचलली. यावेळी खासदार प्रशांत पडोळे यांनी नागरिकांशी चर्चा करत सदर रस्त्याच्या दुरुस्तीसाठी आंदोलन करू. अशी ग्वाही दिली.