शिक्रापूर येथे पोलीस एन्काऊंटर मध्ये ठार झालेला कुविख्यात आरोपी लखन भोसले हा मोक्काच्या गुन्ह्यातील आरोपी होता. त्याच्या विरोधात सातारा, सांगली आणि पुणे ग्रामीण जिल्ह्यात एकूण ३४ गुन्हे दाखल होते, अशी माहिती पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीपसिंह यांनी रविवारी सायंकाळी पाच वाजता पत्रकार परिषदेत दिली. दरम्यान, पोलिसांनी स्वसंरक्षणार्थ गोळीबार केला असून त्यामध्ये भोसले याचा मृत्यू झाल्याचे त्यांनी स्पष्ट केले.