शहरातील दूध डेअरी कॉलनीसह परिसरात काही अज्ञात व्यक्ती मोकाट बिनधास्त फिरत असतांना कुत्र्याच्या आवाजाने त्यांनी परिसरातून पळ काढल्याच्या धक्कादायक प्रकार समोर आला असून संशयीत चोरटे असल्याचे व चोरीच्या उद्देशाने परिसरात दाखल झाल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे.मात्र त्यांचा डाव परिसरातील कुत्र्यामुळे फसल्याने त्यांना रिकाम्या हाती परतावे लागल्याचे समोर आले आहे.ही संपूर्ण घटना परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे.सदरच्या प्रकारामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.