संत तूकाराम महाराजांचा अभंग आहे "मन करा रे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण" याचा अर्थ आपले आंतरिक मन प्रसन्न होत नाही तो पर्यंत आपल्या जिवनाला काही अर्थ नाही स्वतावर प्रेम करने स्वताशी प्रमाणिक राहणे शिका हे संत तूकाराम महाराजांचे विचार आजही बोध घेण्यासारखे आहेत असे प्रतिपादन मुनघाटे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ राजाभाऊ मूनघाटे यानी केले.ते आज दि.११ सप्टेबंर गूरूवार रोजी महाविद्यालयात आयोजित तूकाराम महाराज अभंग गायन स्पर्धेत अध्यक्षस्थानावरून मार्गदर्शन करताना बोलत होते.