महाराष्ट्र सरकारने पावसाळी अधिवेशनात सादर केलेल्या जनसुरक्षा विधेयक २०२४ विरुद्ध आज दि १० सप्टेंबर ला १ वाजता वाजता चंद्रपूरच्या गांधी चौकात महाविकास आघाडीने तीव्र आंदोलन केले. हे विधेयक लोकशाहीच्या मूल्यांना मुठमाती देणारे असून, हुकूमशाही प्रवृत्तीला खतपाणी घालणारे असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला. विरोधकांनी या कायद्याला 'काळा कायदा' असे ठामपणे घोषित केले आहे.