जिल्ह्यातील 3 खासदार मतदार संघांचे आमदार व पालकमंत्री यांनी धर्माबाद तालुक्यात अतिवृष्टी होऊन देखील अद्यापही फिरकले नसल्याने आज पानसरे चौक - नरेंद्र चौक- नेहरू चौक - नगर पालिका चौक - ते पुन्हा पानसरे चौका दरम्यान शेतकरी संघर्ष समितीच्या वतीने लोक प्रतिनिधीच्या गाडीमध्ये पेट्रोल डिझेल टाकण्यासाठी भीक मांगो आंदोलन आजरोजी सकाळी 11 ते 12:30 या वेळेत करण्यात आले आहे, त्यांना धर्माबाद तालुक्यात येण्यासाठी पेट्रोल डिझेल साठी भीक मागून पैसे गोळा यावेळी करण्यात आले आहेत.