गणेशोत्सवाच्या काळात कोकणात लाखो चाकरमानी दाखल होत आहेत. या पार्श्वभूमीवर रत्नागिरी जिल्ह्यातून शेकडो एसटी बसेस मुंबईकडे धाडण्यात आल्या आहेत. मात्र या निर्णयाचा फटका थेट खेड तालुक्यातील ग्रामीण प्रवाशांना बसला असून, वाडीवस्त्यांमध्ये धावणाऱ्या शेकडो नियमित फेऱ्या रद्द झाल्या आहेत. परिणामी ग्रामीण भागातील वाहतूक अक्षरशः ठप्प झाली असून, प्रवाशांना मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. खेड एस.टी. आगारात आज दिवसभरात ७० फेऱ्या रद्द करण्यात आले आहेत.