उदगीर शहर पोलिसांनी उदगीर शहरातील पत्तेवार चौकात अवैध विदेशी दारू घेवून जाणारा ऑटो पकडला याप्रकरणी उदगीर शहर पोलीस ठाण्यात २७ ऑगस्ट रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे,२६ ऑगस्ट रोजी रात्री बजाज कंपनीचा ऑटो क्रमांक एम.एच.५५ ए ०३१२ या ऑटोरिक्षा मध्ये विदेशी दारू घेवून जात असताना पोलिसांना मिळून आला,१५ हजार ५१५ रुपयांची विदेशी दारू व १ लाख ५० हजारांचा ऑटो असा एकूण १ लाख ६५ हजार १५ रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी ताब्यात घेवून दोघांवर गुन्हे नोंदवले आहेत