4 सप्टेंबर रोजी राजवाडा जवळून एका, 9 वर्षाच्या अल्पवयीन चिमुकलीचा अपहरण करण्याचा गुन्हा, शाहूपुरी पोलीस ठाण्यात दाखल झाला होता, त्या अनुषंगाने शाहूपुरी पोलिसांनी सखोल तपास करत, घटना स्थाळावरून सीसीटीव्ही व बातमीदार मार्फत, माहिती घेऊन एका अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले असून, त्याच्याकडे चौकशी केली असता, त्याने सदर गुन्हा केला असल्याचे कबूल केले आहे, अशी माहिती शाहूपुरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक म्हेत्रे यांनी दिली.