फुलंब्री तालुक्यातील आळंद येथील जमदाडे कुटुंबीयांनी कर्जाच्या ओझाखाली दबवून आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. रमाबाई जमदाडे यांनी शुक्रवारी सायंकाळी विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली त्यांचा अंत्यविधी शनिवारी दुपारी बारा वाजता झाल्यानंतर सहा वाजेच्या दरम्यान सहा तासाच्या अंतरानेच पती विलास जमदाडे यांनी विहिरीलगत असणाऱ्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. या घटनेची वडोद बाजार पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.