नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे अनेक दिवसांच्या प्रतीक्षेनंतर आता उद्घाटन होणार आहे. आठ ऑक्टोबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात येणार आहे. त्याच पार्श्वभूमीवर सर्व तयारी आणि चाचणी देखील घेतली जात आहे . उद्घाटनापूर्वी नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर एअर इंडिया वन च्या वतीने लँडिंग करण्यात आले. लँडिंग चा व्हिडिओ समोर आला असून हा व्हिडीओ सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे.