मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांचे आंदोलन लवकरात लवकर मिटावं अशी मागणी माजलगाव मतदार संघाचे आमदार प्रकाश सोळंके यांच्यासह बीड जिल्ह्यातील आमदारांनी केली आहे तसेच सकारात्मक सरकारने भूमिका घ्यावी आणि तसेच ज्याच्याकडे शेतीचा सातबारा आहे जे पूर्वीपासून शेती करत आहेत त्यांना कुणबी प्रमाणपत्र देण्यात यावे अशी आमची मागणी आहे ही मागणी आणि उपसमिती यांच्यापुढे मांडली आणि त्यांनी ती मान्य केली आहे असे आमदार प्रकाश सोळंके माध्यमांसमोर बोलत होते