अंजनगाव सुर्जी मार्गावरील निलकमल हॉटेल जवळ आज दुपारी २ वाजताच्या सुमारास दोन वाहनांचा भीषण अपघात झाला त्यामुळे परिसरात खळबळ उडाली. गाडीवरील नियंत्रण सुटल्याने ती थेट डिव्हायडर ओलांडून विरुद्ध दिशेने येणाऱ्या दुसऱ्या वाहनावर धडकली. या भीषण धडकेत दोन्ही गाड्यांचे मोठे नुकसान झाले असून वाहनातील काही जण जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे.भरधाव वेगाने येणाऱ्या कारच्या चालकाने अचानक वाहनावरील ताबा गमावल्याने कार ने प्रथम डीवाडरला धडक दिली