रस्त्याने चालणाऱ्या व्यक्तीच्या हातातून मोबाईल हिसकावून नेणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करून बुटीबोरी पोलिसांनी मुख्य आरोपी सह एका अल्पवयीन ला ताब्यात घेतले आहे. अटकेतील आरोपीचे नाव पंकज बांगरे असे सांगण्यात आले असून आरोपीकडून तेरा मोबाईल, गुन्हात वापरलेल्या दोन दुचाकी असा एकूण तीन लाख पाचशे रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. आरोपीविरुद्ध बुटीबोरी ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली असून पुढील तपास पोलीस करीत आहे.