सोलापूर जिल्ह्यातील नागरिकांनी गणेशोत्सव पारंपरिक पद्धतीने व डॉल्बीमुक्त, लेझरमुक्त पद्धतीने साजरा करावा, यासाठी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी शनिवारी सायं आदेश जारी केला आहे. हा आदेश २७ ऑगस्ट ते ६ सप्टेंबर २०२५ या कालावधीत लागू राहणार आहे. डॉल्बी साऊंड सिस्टिम, डीजे, प्रेशर हॉर्न, लेझर लाईट्स, फटाके यांचा वापर पूर्णपणे बंदीस्त आहे. धार्मिक उत्सव शांततेत, पारंपारिक वाद्यांच्या साथीने साजरे करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.