दोन दिवसापासून सुरू असलेल्या पावसामुळे आर्वी तालुक्यातील निम्म वर्धा धरणाच्या पाण्यात मोठ्या प्रमाणात वाढ झाली त्यामुळे आज सकाळी नऊ वाजल्यापासून निम्न वर्धा धरण प्रकल्पाचे 19 दारे 30 सेंटीमीटरने ने उघडण्यात आली आहे या धरणात 83% पाणीसाठा झाला आहे त्यामुळे 19 दारातून 524.25 घनमीसे पाण्याचा विसर्ग वर्धा नदी पात्रात सोडण्यात आला असून वर्धा नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आल्याची माहिती उपविभागीय अभियंता पवन पांढरे यांनी दिली आहे