आम आदमी पक्षातर्फे संपूर्ण राज्यात शासकीय शाळांची दयनीय अवस्था व शिक्षण क्षेत्राबाबत उदासीन असलेल्या सरकार विरोधात झोपा काढा आंदोलन आज दि 21 आगस्ट 12 वाजता करण्यात आले. चंद्रपुरात महानगरपालिका समोर आप ने हे अभिनव आंदोलन करीत मनपा, स्थानिक लोकप्रतिनिधी यांचा शिक्षण क्षेत्राकडे असलेल्या दुर्लक्षाबाबत निषेध केला.या अभिनव आंदोलनात आप चे पदाधिकारी स्थानिक आमदार जोरगेवार यांचे मुखवटे घालून सामील झाले होते