अवैध धंदे रोखण्यास महाराष्ट्राचे गृहखाते अपयशी आहे, हे पालकमंत्री नितेश राणे यांनी कणकवली येथील मटका अड्ड्यावर स्वतः धाड टाकून दाखवले त्यामुळे त्यांचे अभिनंदन, असा टोला काँग्रेसचे सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष इर्शाद शेख यांनी आज शनिवार २३ ऑगस्ट रोजी सायंकाळी ५ वाजता कुडाळ येथे पत्रकारांशी बोलताना लगावला आहे. तसेच नुसते पालकमंत्र्यांनी स्टंटबाजी न करता सिंधुदुर्ग जिल्हा अवैध धंदे मुक्त करावा, असे आव्हानही त्यांनी दिले आहे.