मेयो हॉस्पिटल येथे जेनटेक इंजीनियरिंग सर्विसेस या कंपनीमार्फत विद्युत उपकरण फिटिंग चे काम सुरू आहे. दरम्यान अज्ञात आरोपीने मेयो हॉस्पिटल मधील एडमिन बिल्डिंग येथील गोडाऊनचा पत्रा काढून पाच लाख 65 हजार 280 रुपयांचे कॉपर वायर चोरून नेले. याप्रकरणी प्रोजेक्ट मॅनेजर सौरभ लिखार यांनी दिलेल्या तक्रारीवरून तहसील पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपी विरुद्ध 5 सप्टेंबरला दुपारी पाच वाजता गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस करीत आहे.