आदर्श नगर येथील दुय्यम निबंधक कार्यालयाच्या समोर काहीही कारण नसतांना एका तरूणाला अनोळखी ४ जणांनी तोंडाला रूमाल बांधून शिवीगाळ करत लोखंडी पाईपाने बेदम मारहाण करून गंभीर दुखापत केल्याची घटना बुधवारी ३ सप्टेंबर रोजी सायंकाळी ५ वाजता घडली. याप्रकरणी गुरूवारी ४ सप्टेंबर रोजी मध्यरात्री १ वाजता रामानंद नगर पोलीस ठाण्यात अनोळखी चार जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.