सहकारनगर पोलिसांची धडक कारवाई : गांज्याच्या ३ लाखांचा मुद्देमाल जप्त, इसमाला अटक सहकारनगर पोलीस ठाण्याच्या पथकाने केलेल्या कारवाईत तब्बल १० किलो १३८ ग्रॅम वजनाचा, अंदाजे ३ लाख रुपये किमतीचा गांजा जप्त करण्यात आला असून, एक इसमाला अटक करण्यात आली आहे. रांका ज्वेलर्सजवळील मोरे वस्ती परिसरात गस्ती दरम्यान ही कारवाई करण्यात आली. सहकारनगर पोलिसांच्या हद्दीत अवैध धंद्यांवर नियंत्रण ठेवण्यासाठी वरिष्ठ पोलीस निरीक्षक विठ्ठल पवार व पथक गस्त घालत असताना, एन.डी.पी.एस. गुन्ह्यांतील जामिनावर असले