लोकमान्य टिळकांनी समाजाची एकजूट आणि जनजागृतीसाठी सार्वजनिक गणेशोत्सव सुरू केला. महाराष्ट्रात सध्या २ लाखांहून अधिक गणेशोत्सव मंडळे आहेत. प्रत्येक वस्ती, प्रत्येक गल्लीत ही सामाजिक ऊर्जा कार्यरत आहे. मंडळांनी या ऊर्जेतून प्रौढ निरक्षरांना साक्षरतेचे धडे देण्यासाठी पुढाकार घ्यावा. एका गणेश मंडळाने किमान ५० प्रौढांना साक्षर करावे, असे नियोजन राज्याच