महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाचे सदस्य प्रा. डॉ. गोविंद काळे हे मंगळवार, २६ ऑगस्ट २०२५ रोजी लातूर जिल्ह्यात दौऱ्यावर येत आहेत. त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.प्रा. डॉ. काळे यांच्या उपस्थितीत २६ ऑगस्ट रोजी सकाळी ११ वाजता लातूर जिल्हाधिकारी कार्यालय येथे १ ऑगस्ट २०२४ ते ऑगस्ट २०२५ या कालावधीत ओबीसी, एसबीसी, व्ही.जे., एनटी., एसईबीसी, ईडब्ल्यूएस या संवर्गातील वितरीत केलेली जात प्रमाणपत्रे व जात वैधता प्रमाणपत्रे यांचा आढावा, तसेच भटक्या विमुक्त आश्रमशाळांबाबत आढावा बैठक होईल.