कालपासून सुरू असलेल्या मुसळधार अतिवृष्टीमुळे देगलूर तालुक्यातील लेंडी व मन्याड नदीच्या पाणी पात्रात मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याने याचा फटका बसून तरीटाकळी वझरगा तूपशेळगाव लख्खा गळेगाव आदि गावानजीक असणाऱ्या पुलावरून पाणी वाहत असल्याने नांदेड ते हैद्राबाद व्हाया देगलूर हा रस्ता कालपासून बंद झाला असून वाहतूक ठप्प झाली असून वाहणांच्या लांबच लांब रांगा लागल्या असल्याचे आजरोजी दुपारी 12 वाजेपर्यंत पाहायला मिळाले आहे.