आमदार संजय केळकर हे नागरिकांच्या समस्या अडचणी समजून घेण्याकरिता तसे त्यांच्याशी संवाद साधण्याकरता खोपट येथे जनसेवकांचा जनसंवाद उपक्रम राबवतात. त्या माध्यमातून आतापर्यंत शेकडो विविध प्रश्न मार्गी लावले आहेत. त्यामध्ये अतिक्रमण विभाग, विकासकाकडून होणारी फसवणूक, कळवा रुग्णालयातील नर्स,वारसा हक्क, ऍडमिशन असे विविध विषय मार्गी लावल्याने नागरिकांनी त्यांचे आभार मानले आहेत.