वैजापूर-गंगापूर मतदारसंघातील मौजे "पानवी खु" गावाचे भूषण, अभिमान असलेले सुभेदार श्री. भाऊसाहेब शामराव पा. मोहन यांनी भारतीय सैन्यदलात तब्बल २८ वर्षे विविध संकटांना सामोरे जात शौर्याने कर्तव्य बजावत देशसेवा केली. आपल्या दीर्घ आणि यशस्वी सेवेनंतर ते सन्मानपूर्वक सेवानिवृत्त झाले आहेत. जो सैनिक राष्ट्रासाठी अहोरात्र झटतो, त्याचा सन्मान करणे हे आपले कर्तव्यच आहे. असे विधान आमदार बोरनारे यांनी प्रसंगी केले.