जिल्ह्यातील सर्व पंचायत समिती सभापती, जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्य पदाच्या आरक्षण निश्चितीसाठी जिल्ह्यात १३ ऑक्टोबर २०२५ रोजी आरक्षण सोडतीचे आयोजन करण्यात आले आहे. जिल्हा परिषद सदस्य आणि पंचायत समिती सभापती पदासाठी आरक्षण सोडत जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन समिती सभागृहात १३ ऑक्टोबर रोजी दुपारी ३ वाजता होईल. तसेच पंचायत समिती सदस्य पदाची आरक्षण सोडत संबंधित तालुक्याच्या ठिकाणी निश्चित केलेल्या ठिकाणी याच दिवसी सकाळी ११ वाजता होणार आहे.