आज दिनांक 28 सप्टेंबरला पोलीस सूत्रांकडून प्राप्त झालेल्या माहितीनुसार, शिरखेड पोलीस स्टेशनच्या हद्दीत येत असलेल्या राजुरवाडी शेत शिवारात असलेल्या खोपडीचे कुलूप तोडून फवारणी पंपा सहित साहित्य चोरीला गेल्याची तक्रार दिनांक 27 सप्टेंबरला रात्री दहा वाजून 17 मिनिटांनी गणेश अंबादास भटकर राहणार चांदूरबाजार यांनी शिरखेड पोलीस स्टेशनला दाखल केली आहे. दाखल तक्रारीवरून शिक्षक पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करून तपासात घेतला आहे