महागाव तालुक्यातील पोखरी येथे बांधण्यात आलेल्या पाझर तलावामुळे लगतच्या शेतजमीनी दरवर्षी पुरामुळे खरडून जात असून त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे. या सततच्या नुकसानीमुळे शेतजमीन शेतीयोग्य राहिलेली नसल्याने ती शासनाने पाझर तलावात संपादित करावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. आज दि. २ सप्टेंबर रोजी सायंकाळी ५ वाजता शेतकरी किसन भिका पवार यांनी राज्यमंत्री इंद्रनील नाईक यांना या संदर्भात निवेदन दिले.