यावल शहरातून भुसावळ जाणारा रस्ता आहे.या रस्त्यावर महाराष्ट्र ढाबा आहे. या डाव्या समोर अपे रिक्षा क्रमांक एम.एच.१९ बी.जे. ९९२३ व अवजड साहित्य नेणाऱ्या कंटेनर क्रमांक आर. जे. ३२ जी.बी.४२५६ यांचा अपघात घडला. या अपघातात नऊ जण जखमी झाले. जखमींवर यावल ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहे. तर याप्रकरणी यावल पोलीस ठाण्यात अपघात बाबत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.