शेअर ट्रेडिंगमध्ये गुंतवणूक केल्यास जादा नफ्याचे आमिष दाखवून एका कंपनीच्या प्रतिनिधीने 17 लाख 18 हजार 637 रुपयांची फसवणूक केल्याची घटना आली आहे. फिर्यादी यांच्याशी नुवामा वेल्थ कंपनीचे प्रतिनिधी कंगना शर्मा,आशिष केहेर व त्यांच्या इतर साथीदारांनी विविध सात मोबाईल क्रमांकांवरून व्हॉट्सअॅपद्वारे संपर्क साधला. त्यांनी फिर्यादीला शेअर ट्रेडिंगमध्ये गुंतवणूक केल्यास मोठ्या प्रमाणात कमिशन मिळेल,असे आमिष दाखवून फसवणूक केली.