स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने झाराप येथे मोठी कारवाई करत, गोवा बनावटीची दारू आणि दोन गाड्यांसह १० लाख ९२ हजार ८०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या कारवाईत पोलिसांनी चार संशयित आरोपींनाही अटक केली आहे. ही कारवाई आज पहाटे करण्यात आली अशी माहिती पोलीस उपनिरीक्षक हनुमंत भोसले यांनी गुरुवार ११ सप्टेंबर रोजी सायंकाळी ४ वाजता दिली.