उद्योग विभागाचे विकास आयुक्त दीपेन्द्र सिंह कुशवाह यांनी आज दि 22 आगस्ट ला 12 वाजता दिलेल्या अभिनंदन पत्रानुसार, चंद्रपूर जिल्ह्याची ही उद्दिष्टपूर्ती जिल्हा प्रशासनाचे सक्षम नेतृत्व जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी. यांच्या नेतृत्वात, यंत्रणेमधील प्रभावी समन्वय आणि अधिकाऱ्यांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांमुळे शक्य झाली आहे. जिल्ह्यातील युवक-युवतींना स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी हा उपक्रम मोलाची भूमिका बजावत असल्याचे त्यांनी आज सांगितले.