लातूर जिल्ह्यासह मराठवाड्यात पुन्हा एकदा आकाशात ढग दाटू लागले असून, महाराष्ट्र राज्य आपत्ती व्यवस्थापन विभागाने (SDMA) रात्रीचा हवामान इशारा जारी केला आहे. मंत्रालय, मुंबई येथून रात्री 10 :०० वाजता प्रसारित झालेल्या या अलर्टनुसार, पुढील ३ तासांत म्हणजे ६ ऑक्टोबर रात्रीपासून ७ ऑक्टोबर पहाटे १ वाजेपर्यंत लातूर, हिंगोली, नांदेड आणि धाराशिव या जिल्ह्यांमध्ये मेघगर्जनेसह हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या सरी पडण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.