गिरड येथे वांघाचा तातडीने बंदोबस्त करण्याच्या मागणीसाठी गिरड येथील शेकडो शेतकऱ्यांनी वनविभागाचे कार्यालय गाठून ३ तास ठिय्या आंदोलन करीत उपवनसंरक्षक हरबिंदर सिंग यांना निवेदन दिले.खुर्सापार जंगलामध्ये गेल्यावर्षीपासुन एक वाघीण व तिचे तिन बच्छडे, आणि एक वाघ असे एकुण ५ वाघांचे वास्तव्य आहे.या वाघानी आतापर्यंत अनेक जनावराचे शिकार केली आहे.आता या वाघांनी आपला मोर्चा शेतशिवारांकडे वळविला असुन हे वाघ रोज शेतामध्ये भ्रम करीत असल्याने शेतकरी व शेतमजूरांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे.