मागील अनेक वर्षापासून सुरळीत सुरू असलेली औंढा नागनाथ ते नांदगाव अंजनवडा मार्गे दररोज दुपारी दोन वाजता जाणारी बस फेरी राज्य परिवहन मंडळाकडून अचानक बंद करून दुसऱ्या मार्गावर वळवली आहे त्यामुळे शालेय विद्यार्थी विद्यार्थिनींना अंजनवाडा तसेच पुढील गावाकडे परत जाण्यासाठी मोठी अडचण निर्माण होत आहे त्यामुळे बस फेरी तात्काळ सुरू करावी यासाठी विद्यार्थ्यांनी रिपब्लिकन सेनेचे युवा प्रदेशाध्यक्ष किरण घोंगडे यांच्या नेतृत्वाखाली 25 ऑगस्ट रोजी औंढा नागनाथ वाहतूक नियंत्रकास निवेदन देत केली आहे