आगामी श्री गणेश उत्सव तसेच ईद ए मिलाद निमित्ताने जिल्हयात कायदा व सुव्यवस्था अबाधीत राहुन जातीय सलोखा कायम रहावा व सर्व प्रकारचे सण उत्सव मोठ्या उत्साहात व शांततेत पार पाडावा या साठी आज दि २५ ऑगस्टला १२ वाजता वरोरा उपविभागाची बैठक पोलीस स्टेशन वरोरा अंतर्गत घेण्यात आली. सदर बैठकीत लोकप्रतिनिधी तसेच अप्पर पोलीस अधीक्षक चंद्रपूर, संबंधीत उपविभागीय पोलीस अधीकारी आणि ईतर प्रशासकीय अधिकारी यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.