न्यायालयाच्या आदेशाचे व पोलीस दलाने दिलेल्या सूचनांचे उल्लंघन करणाऱ्या आसरे, ता. वाई, येथे मर्यादेपेक्षा जास्त आवाजात लावलेल्या एका डॉल्बीवर वाई पोलिसांनी मंगळवारी रात्री उशिरा कारवाई केली आहे. पोलीस ठाण्यातून बुधवारी दुपारी साडेचार वाजता मिळालेल्या माहितीनुसार डॉल्बीच्या गोंगाटावर पोलिसांनी धडक कारवाई करत दोघांविरुद्ध खटला दाखल केला आहे. पोलीस अंमलदार प्रसाद दुदुस्कर यांनी दिलेल्या तक्रारीनुसार सचिन शिवाजी सावंत रा. सुलतानपूर व अक्षय बाळू सणस रा. आसरे यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला.