परळी तालुक्यातील पोहनेर येथील महाराष्ट्र ग्रामीण बँकेने शेकडो कर्जदार शेतकऱ्यांची बचत खाती गोठवली आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना पैसे काढणे, व्यवहार करणे यात मोठी अडचण निर्माण झाली आहे. या निर्णयामुळे शेतकरी संतप्त झाले असून त्यांनी आज सोमवार दि 25 ऑगस्ट रोजी दुपारी 12 वाजता, थेट बँक शाखेत जाऊन व्यवस्थापक बिष्णोई यांना धारेवर धरले.शेतकऱ्यांनी खाती तात्काळ सुरू करावीत, अन्यथा तीव्र आंदोलन करू असा इशारा दिला आहे. या वेळी विष्णु रोडगे, रामेश्वर पौळ, दत्तात्रय तसमुसे, पत्रकार मिलिंद चोपडे, र